राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत ग्रामीण परसबाग शेळी
विकास योजना
अहिल्या शेळी योजना-Ahillya Sheli Yojana
योजनेचे ठळक वैशिष्ठे
• राज्यात शेळी पालन व्ययसायास प्रोत्साहन देण्यासाठी.
योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ Ahillya Sheli Yojana
• उस्मानाबादी / संगमनेरी अथवा स्थानिक वातावरणात तग घरातील अशा प्रजातींच्या पैदासक्षम १० शेळ्या व १ बोकड असा शेळीगत वाटप करण्यात येईल
• एकूण रक्कम रु ६६०००/-
• लाभार्थी साठी ९०% शासन हिस्सा ( रु ५९,४००/-) व १०% लाभार्थी हिस्सा (रु, ६६००/-)
अनुसूचित जाती जमाती साठी
• दारिद्र्य रेषे खालील लाभार्थी
• अल्प भूधारक (१ ते २ हेक्टर पर्यन्त भूधारक)
• महिलां लाभार्थीनाच प्राधान्य • लाभधारकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत गेल्या ३ वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही..
• एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येईल. 'Ahillya Sheli Yojana'
• अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सेवेत किंवा सेवानिवृत्ती वेतनधारक / शासकीय पदाचा लाभ घेणारा, तसेच राज्य, केंद्र शासन / स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य / पदाधिकारी/ लोकप्रतीनिधी नसावा.
अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती
• अर्ज सादर करण्याचा कालावधी १०/१२/२०२२ ते २५/१२/२०२२ पर्यंत
• योजनेची पूर्ण माहिती या अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील www.mahamesh.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. "Ahillya Sheli Yojana"